Ad Code

# rain राज्यात दमदार पाऊस, मुसळधारेचा इशारा

मुंबई ः राज्याच्या विविध भागात गेल्या दोन-तीन दिवसापासून दमदार पाऊस  सुरु आहे. त्यामुळे खरिपाच्या  पेरलेल्या  पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार  पेरणीचे संकट टळले असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या 24 तासात राज्यातील विविध भागात जोरदार, दमदार तर मुंबई, ठाणे व रायगड जिल्ल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांना दोन दिवसासाठी रेड अलर्ट दिला आहे. 


हे ही वाचा ः कृषी विद्यापीठाचा सल्ला, अशी घ्या जनावरांची काळजी

राज्यात यावर्षी मान्सुन पावसाअाधीचा पुर्वमोसमी पाऊस जोरदार झाला. त्यामुळे यंदाहीची परिस्थिती चांगली राहिल असे गृहीत धरुन खरिपाच्या  पेरण्या झाल्या. मात्र राज्यातील बहूतांश भागातून पाऊस निघून गेल्याने खरिपाची पीके वाया जातात की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा पावसाचे आगमन  झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसात परभणी, बुलढाणा, बीड, औरंगाबाद, नगर, नांदेड भागात पाऊस झाला. कोकण, विदर्भातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाया जाणारी पिके आता वाचली आहे. राहिलेली पेरणीही उरकणार असल्याचे दिसत आहे. मान्सुनेने आता संपुर्ण देश व्यापला आहे. 

आज दि. 14 रोजीही राज्यातील बहूतांश भागात ढगाळ वातावरण होते. घाटमाथ्यासह सर्वच भागात पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रत्नागिकी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात जास्ती  पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगडात मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. एकंदर राज्यात चांगल्या पावसामुळे शेतीची स्थिती चांगली असून शेतकरी समाधानी आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu