मुंबई ः मुंबई, उपनगरासह कोकणातील बहूतांश भागात जोरदार व मुसळधार पाऊस पडत आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रती तास वारे वाहत असून अजून दोन दिवस असाच पाऊस सुरु राहणार असल्याचा हवामान खात्याने मुंबई, कोकणासाठी अलर्ट दिला आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर प़डू नये असे अवाहन करण्यात आले आहे. कोकण, कोल्हापुर, सातारा जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यातील अन्य मराठवाडा, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रातील बहूतांश भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(Heavy and torrential rains are falling in Mumbai, suburbs and most parts of the Konkan. The meteorological department has issued an alert for Mumbai and Konkan that the winds will be 40 to 50 kmph and it will continue to rain for two more days. Citizens are urged not to leave their homes without work. Heavy rains have also started in Konkan, Kolhapur and Satara districts. Other parts of the state like Marathwada, Vidarbha and most parts of Western Maharashtra are forecast to receive rains)
हे वाचा ः # corona शिरुर कासार तालुक्यात 42 कोरोना बाधित आढळले. प्रशासनाने तातडीने नियम बदलले
मुंबईत आज दि, 21 जुलै रोजी सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, पालधर, ठाणे, भिंवडी आदी मुंबई परिसरातील भागातही जोरदार पाऊस सुरु आहे. काही भागात पाणी साचले आहे. त्यामुळे राज्याच्या भागातून मुंबईत जाणाऱ्यांनी कामाशिवाय मुंबईत जाऊ नये तसेच मुंबईमधील नागरिकांनीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे अवाहन करण्यात आले आहे. अजून दोन दिवस असाचा पाऊस सुरु राहु शकतो असा अंदाज असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे वाचा ः कृषी विद्यापीठाचा सल्ला, अशी घ्या जनावरांची काळजी
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. महाबळेश्वर पट्ट्यात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना धरणात पाण्याची वेगाने आवक होत आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीसह अन्य नद्या दुथडी भरुन वाहत असून पंचगंगाची पाणी पातळी 29 फुटावर गेली आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग् झाला नाही तर सांगली, कोल्हापुरात पुर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग व्हावा यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
नगर जिल्ह्यातील अकोले तालु्क्यातही पावसाचा जोर कायम आहे. राज्यभर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील मराठवाडा, नगर, सोलापुर, नाशिक, विदर्भ, खानदेश अन्य भागात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या