Ad Code

#Rain मुंबई, कोकणात पावसाचा हाहाकार, चोवीस तास जोर कायम राहणार

पुणे ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, मुंबई, पुणे जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तर अनेक गावांत पाणी शिरले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अजून चोवीस तास  पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जोरदार पावसाने मुंबई, कोकणातील जनता हवालदिल झाली आहे. मात्र अजूनही राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.   

महाराष्ट्रातील विविध भागात चार दिवसापासून पाऊस सुरु झाला आहे. खास करुन कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापुर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, नगरमधील अकोले, नाशिकमधील इगतपुरी, घोटी व पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, विदर्भातील अमरावती, धुळे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने कोकणातील चिपळुन येथे गावांत पाणी शिरले असल्याने एनडीआरएफ च्या टीम दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरातही पंचगंगा नदीने पातळी ओलांडली आहे. नदीकाठ्या लोकांची स्थलांतर केले जात आहे. त्यासाठी एनडीआरएफ च्या दोन टीम येथे  दाखल झाल्या आहेत. 

 हे वाचा ः मदतीसाठी सरसावले हात, संकटकाळी मित्रांनी दिला मदतीचा आधार

अनेक भागातील रेल्वे रुळावर पाणी तर काही ठिकाणी दरड कोसळल्याने मुंबई, कोकणातील तसेच मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे चोवीस तासात सर्वाधिक 480 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे 434 मिलीमीटर पाऊस झाला. 

जोरदार पावसामुळे कोयना, मुळा, भंडारदरासह राज्यातील मोठ्या धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरु केला जात असल्याने गोदावरी नदीतून हे पाणी जायकवाडी धरणात येणार आहे.  पु्ण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण भरले आहे. आरबी समुद्राच्या पश्चिम किनार पट्टीला समांतर असेलला हवेच्या  कमी दाबाचा पट्टा निर्मा्ण झाला आहे. हा पट्टा गुजरातपासून  केरळपर्यत विस्तारला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासातसही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu