Ad Code

# Chief Minister Uddhav Thackeray परिस्थिती पाहून मुभा देतोय, पण रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लाॅक़डाऊन करावे लागेल ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ः कोरोनाच्या गेल्या दिड वर्षात दोन गंभीर लाटा अनुभवल्या. आता तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिस्थिती पाहून राज्यातील काही भागात शिथीलता देत आहोत. मात्र परिस्थितीनुसार रुग्णवाढ झाली, लोकांनी काळजी घेतली नाही तर मात्र पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ येईल. त्यामुळे अशा वेळ येऊ नये यासाठी लोकांनी काळजी घ्यावी असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत 15 आॅगस्टपासून लोकसेवा सुरु होत आहे. लसीचे दोन डोस घेऊन पंधरा दिवस झाले अशा लोकांना त्यात सुट असेल असे सांगतानाच आठ जिल्ह्यात अजूनही स्थिती काळजी करण्यासारखी आहे असे ठाकरे म्हणाले. (The situation has worsened, but if people don't take care, it will be time to lockdown again. Therefore, Chief Minister Uddhav Thackeray appealed to the people to be careful so that such a time does not come. Public service is starting from August 15 in Mumbai. "People who have taken two doses of the vaccine for 15 days will be exempted," Thackeray said, adding that the situation in eight districts was still worrying.) 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी आठ वाजता राज्यातील जनतेला आॅनलाईन संबोधीत केले. कोरोना अजून  गेलेला नाही. ज्या गोष्टी पाळायच्या त्या पाळल्या पाहिजेत. राज्यात लस पुरवठा वाढत आहे. लसीकरणाचा वेग वाढत आहे. जोपर्यत लसीकरण ठरावीक टपप्यापर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यत काळजी घ्यावी लागेल. राज्यात तिसरी लाट येऊच नये, यासाठी सरकार काम करत आहे.  पण आली तरी आपण आरोग्य सुविधेत सुधारणा करत 


आहोत. टेस्टींग लॅब 2 वरुन 600 केल्या आहे. साडेचार लाख आयसोलेशन बेड आहेत. आयुसीयु बेड दिड लाख आहेत. साडेतेरा हजार व्हटेंलेटर आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात अजूनही कोरोना बाधितांचे आकडे कमी होत नाहीत. विषाणु बदलतोय. त्याचा बदल कळेपर्यत प्रसार झपाट्याने होत असतो. बदलता ट्रेड परिणामकारक आहे. हे ओळखण्यासाठी देशातील पहिली लॅब मुंबई महापालिकेने सुरु केली. त्याचा उपयोग राज्यासाठी करत आहोत नवीन व्हेरियंट तपासतो. दोन डोस लसीचे घेऊन पंधरा दिवसाचा कालावधी झाला त्यांना सवलती देत आहोत. या बाबीवर लक्ष ठेवून शिथीलतेचा विचार होत आहे. 

नुकत्याच काही जिल्ह्यात दुकानांच्या वेळा वाढल्या. काही बंधने शिथील केली. राज्यात काही ठिकाणी कोविड अटोक्यात आहे. तर काही ठिकाणी अजूनही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापुर, नगर, पुणे, सोलापुर, बीड या जिल्ह्यात येथे कोविड रुग्ण कमी होत नाहीत. आता तिकडे तपासणी जोरात असून लक्ष ठेवून आहेत. पुरग्रस्त भागात पाण्यामुळे आजार होऊ नयेत यासाठी सरकार लक्ष ठेवून उपाययोजना करतेय. अतीवृष्टात प्रशासनाचे काम कौतुकास्पद आहे. साडेचार लाख लोकांचे स्थलांतर केले. आता त्यांच्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. 

कुठेही आपत्तीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आल्यानंतर एका पॅकेजची घोषणा होते हा नियम आहे, पण मी घोषणा केली नाही. वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले. तत्काळ 11 हजार कोटीची तरतुद केली. याआधीही अशी संकटे आली. त्यावर तज्ज्ञांची समिती नियुक्ती होऊन अहवाल सादर झाले. अमलबजावणी नाही. आता त्यातील बाबीचा विचार करुन निर्णय सरकार घेईल. मराठा, ओबीसी, आरक्षण इम्परेकल डेटाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला देण्याची केंद्राला विनंती केली. ती पंतप्रधानांनी मान्यकेकली. 50 टक्क्यांची अट रद्द करण्याची मागणी केली आहे. अधिकार आल्यावर सर्व बाबी सोडावायच्या आहेत. 

शासनाची मोठी जबाबदारी आहे. कोविडमुक्त गाव संकल्पना आहे. अनेक सरपंचाचे तसे प्रयत्न केले. आता कार्यालयाने कामाच्या वेळेचे नियोजन व विभागणी करा असे सांगितले आहे. गर्दी टाळा, रेस्टारंट, प्राथनास्थळ, माॅल्स यांना टप्प्याने मोकळे करणार. अजून कोविड गेला नाही. काही लोक भडकवण्याचा प्रयत्न करतात, पण राज्यातील जनतेने उचापत्याकारांना बळी न पडता संयम ठेवताय. त्यामुळे राज्याचे कौतुक राज्य पातळीवर होतेय. हे राज्यातील जनतेमुळे होतेय. 

राज्यात काही ठिकाणी शिथीलता आणतोय. 15 आॅगस्टपासून मुंबईत लोकल सुरु. दोन्ही  डोस, 14 दिवस झाले त्यांना मुभा, लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी अॅप वर एप्लाय करावा लागेल. त्यानंतर पास मिळेल. मोबाईल नसलेल्यांना आॅफलाईन कार्ड मिळेल. 19 लाख लोकांनी दोन डोस घेतलेत, त्यांना प्रवासाला मुभा मिळणार. केरळात रुग्णवाढ दिसतेय. त्यामुळे आपल्याकडे रुग्ण वाढणार नाहीत याची लोकांनाच काळजी घ्याली लागेल. कोरोनाला अमंत्रण दिले जाईल असे काही करु नका. तिसरी आपन काळजी घेऊनच लाट थोपवू शकतो. हे आपल्या हातात आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu