Ad Code

# Increased production in kharif due to change in planting and management लागवड, व्यवस्थापनातील बदलातून खरिपात उत्पादनवाढ

 

चिंचविहिरे ता. राहूरी येथील अभिजीत गीते खरिपात गेल्या चार वर्षापासून तुरीत सोयाबीनचे आंतरपीक घेतात. सुधारीत वाणांच्या  पेरणीतून सोयाबीन, तुरीला ठिंबकच्या वापरासह लागवड, पाणी, खत व्यवस्थापनातील बदलातून उत्पादनात वाढ केली आहे. ठिंबक सिंचनाचा वापर करुन बाजरीचे पीक घेणारे ते याभागातील एकमेव शेतकरी आहेत. त्यांनी शेतीला कुक्कुटपालन, दुध व्यवसायाची जोड दिली आहे. (Chinchvihire Ta. Abhijeet Geete from Rahuri has been intercropping soybeans in Turit for the last four years. The sowing of improved varieties has increased the production of soybean, turi with drip irrigation, change in water, fertilizer management. He is the only farmer in the area to grow bajra using drip irrigation. He has linked agriculture with poultry and dairy business.

-----

हे वाचा ः # Silk farming जिद्दीने सुरु केलेली प्रशांत लगड यांची यशस्वी रेशीम शेती

राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील अमोल व अभिजीत हे दोघांभावांचे कुटूंब. त्यांना वडीलोपार्जीत सहा एकर शेती. अमोल पुण्यात नोकरीला असल्याने अभिजीत शेती व्यवस्थापन पाहतात. अनेक वर्षापासून दरवर्षी खरिपात सोयाबीन, तुर, बाजरी, मका ही पीके घेतात. खरिप हंगामात साधारण दोन एकरावर तुरीत सोयाबीनचे आंतरपीक, एक ते दिड एकरावर मका, एक ते दिड एकरावर बाजरी, एक एकरावर लिंबु फळबाग असून त्यात भुईमुगाचे आंतरपीक हे नियोजन असते. यंदाही त्या प्रमाणे नियोजन केले आहे. 

लागवड व्यवस्थापनात बदल

- खरिपात पेरणी करताना पेरणीपुर्वी एकरी पाच टॅक्ट्रर शेणखत तसेच पेरणीनंतर सोयाबीन, तुर, बाजरी व अन्य पिकांना साधारण दोन वेळा रासायनिक खत एकरी पाच गोण्या टाकत. आता रासायनिक खत वापराचे प्रमाण कमी केले असून एकरी दोन गोण्या टाकतात. 

- चार वर्षापासुन तुरीत सोयाबीनचे आंतरपीक घेतात. पुर्वी बैल तिफनीच्या साहाय्याने पेरणी करताना तुरीच्या दोन ओळीतील आंतर पाऊन फुटाचे व दोन ठोंबातील आंतर साधारण सहा ते सात इंच असायचे. त्याच पद्धतीने सोयाबीनचीही पेरणी करायचे. आता मात्र तुरीत सोयाबीनते आंतरपीक घेतात. 

- तुरीत सोयाबीनचे आंतरपीक घेताना एक ओळ तुरीची व पाच ओळी सोयाबीनच्या. त्यामुळे तुरीच्या दोन ओळीतील आंतर पाच फुट व दोन ठोंबातील आंतर एक फुट झाले. - सोयाबीनचे दोन ओळीचे आंतर एक फुटाचे व दोन ठोंबांतील आंतर 9 ते 12 ईंच इतके असते. - सोयाबीनची पेरणी टॅक्ट्ररने तर तुरीची टोकन पद्धतीने लागवड करतात. - तुर, सोयाबीनमध्ये दोन ओळीतील व दोन ठोंबातील आंतर वाढले. त्यामुळे सोयाबीन, तुरीची चांगली वाढ होते. हवा खेळती राहते. शिवाय तुर चांगली वाढलेली असते त्यावेळी सोयाबीन निघते. त्यामुळे तुरीचा वाढ-विस्तार चांगला होतो.  - चार वर्षापासून तुरीचे पीक साधारण तीन महिन्याचे झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार इंच शेंडाखुडणीचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळे तुरीची शाखीय वाढ थांबून फुटवे वाढण्याला मदत होते. 

- पाण्याने ताण दिला तरी वाढलेल्या पिकांना पुरेसा व आवश्यक तेवढे पाणी देता येते नाही. त्यामुळे चार वर्षापासून तुर, सोयाबीनला ठिंबकचा वापर करतात. 

- खरिपातील पीके पावसाळ्यातील असली तरी अनेक वेळा पावसाने ताण दिल्याने पिकांना फटका बसतो. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून बाजरी, मकासाठीही ठिंबक सिंचनचा वापर करत आहेत. बाजरीच्या पेरणीतही बदल केला आहे. पुर्वी बाजरी पेरताना दोन ओळीतील आंतर 9 इंचाचे आसायचे ते आता एक फुटावर नेले असून दोन ठोंबातील आंतर चार इंचावरुन सहा इंचावर नेले आहे. त्यामुळे फुटवे फुटण्याला फायदा होतो.

- तीन वर्षापुर्वी लागवड केलेल्या एक एकरावरील लिंबाच्या पिकांत खरिपातील भुईमुगाच्या आंतरपीकांचा प्रयोग करतात. दोन ओळीचे आंतर एक फुटाचे व दोन ठोंबांतील आंतर 7 ते 8 इंच इतके ठेवले जाते. पुर्वीपेक्षा आता हे आंतर वाढवले आहे. 

------

हे वाचा ः एक तरुण पुढे आला, त्याच्या प्रयत्नातून आदीवासी शेतकऱ्यांनी कमालच केली,

-----

उत्पादन वाढ 

खरिपातील तुर, सोयाबीन, बाजरीच्या पीक लागवड, व्यवस्थापनातील बदलातुन अभिजीत गीते यांच्या उत्पादन वाढ झाली आहे. त्यांना पुर्वी तुरीचे 4 ते 5 क्विंटल एकरी उत्पादन निघायचे. आता एकरी 13 ते 14 क्विंटल उत्पादन निघते. सोयाबीनचे पुर्वी 4 ते 5 क्विंटल निघायचे. आता  10 ते 12 क्विंटलवर गेले आहे. बाजरीचे उत्पादन पुर्वी 4 ते 5 क्विंटल निघायचे, ते आता 8 ते 9 क्विंटलपर्यत गेले आहे. 

स्लरीचा वापर 

खरिपातील तुर, सोयाबीन, बाजरी पिकांना ठिंबकसोबत स्लरीचा वापर करणारे शेतकरी म्हणून अभिजीत गीते यांची ओळख आहे. गुळ, बसनपीठ, गोमुत्र, शेणाची स्लरी करतात. तुर पिकाला पहिल्यांदा दोन महिन्याचे पीक झाल्यावर व त्यानंतर एक-एक महिन्याच्या आंतराने एकरी 200 लिटर स्लरी देतात. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर नेहमीच्या तुलनेत कमी झाला आहे. त्यांनी गांडुळ खत तयार करण्यासाठी बेड केल आहे. वर्षभरात 4 टन गांडुळ खत तयार होते. त्याचा स्वतःच्या शेतात वापर करतात. 

दुध, कुक्कुटपालनाची जोड

- अभिजीत गीते यांनी शेतीला दुध, कुक्कुटपालनाची चार वर्षापासून जोड दिली आहे. त्यांच्याकडे सध्या सहा एचएफ गाईं असून दररोज 70 ते 80 लिटर दुधाची विक्री करतात. त्यामुळे वर्षभरात 12 टॅक्ट्रर शेणखतही उपलब्ध होत आहे. 

- चाऱ्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील फुले गणवंत चारा बियाणाची आर्ध्या  एकरावर लागवड केलेली आहे. साधारण वीस फुट उंच वाढणाऱ्या चाऱ्यामुळे चारा बऱ्यापैकी उपलब्ध होतो. 

- दोन हजार कोंबड्याचे पालन होईल एवढ्या क्षमतेचे कुक्कुटशेड बांधलेले असून कृषी विद्यापीठाकडून दरवर्षी दिल्या  जाणाऱ्या कावेरी गावराण कोंबड्याच्या 100 कोंबडी कुक्कुटपालनापासून दर वर्षाला साधारण पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.

- दरवर्षी साधारण एक एक मकाचा मुरघास करतात. दुष्काळी परिस्थिती मुरघासामुळेच दुध व्यवसाय तारला.  

कृषी विद्यापीठाचे मागर्दर्शन  

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडुन राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे व कणगर या गावांत कुलगुरु डाॅ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डाॅ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम शेतकरी प्रकल्प राबवला जात असून डाॅ. पंडीत खर्डे, डाॅ, सचीन सदाफळ, किरण मगर हे प्रकल्पाचे काम पाहतात. अभिजीत गीते या प्रकल्पातील शेतकरी आहेत. गीते यांनी तुरीत बीडीएन 711, चाऱ्यात फुले जयवंत, भूईमुगात उन्नती यासारखे नवीन वान शास्त्रज्ञांच्या सल्ल्लाने वापरले. त्याचा उत्पादन वाढासाठी फायदा झाला. सध्या बियाणे, बदल, बीज प्रक्रिया, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन या बाबीवर भर देत खरिपातील पिकांबाबत सर्व बाबीवर शास्त्रज्ञ बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. 


संपर्क ः अभिजीत गीते मो. 7588513627


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu