Ad Code

# The leopard was kept by a farmer in a goat shed and बिबट्याला शेतकऱ्याने तेथे कोंडले शेळ्याच्या गोठ्यात आणि...

संगमनेर ः सध्या अनेक भागात बिबट्याचे दर्शन होतेय. शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ले करुन नुकसान केल्याचेही पहायला मिळत आहे. असाच एक विचित्र प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडला. शेळ्याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला शेतकऱ्याने तेथेच कोंडून ठेवले आणि वन विभागाच्या ताब्यात दिले. मात्र बराच वेळ शेळ्याच्या गोठ्यात राहिलेल्या बिबट्याने आठ शेळ्यांना मारुन टाकले. काही शेळ्या खावून फस्तही केल्या. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. (Farmers' pets have also been attacked and damaged. A similar strange thing happened in Sangamner taluka of Ahmednagar district. The farmer locked the leopard in the goat shed and handed it over to the forest department. But a leopard that had been in the goat shed for a long time killed eight goats. He even ate some goats. This caused huge financial loss to the farmers.)

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याचे अनेक प्रकार सतत घडत आहेत. राहुरी, राहाता, नगर, पारनेर, शेवगाव, नेवासा, श्रीरामपुर, कोपरगाव, संगमनेर, अकोले तालुक्यातील अनेक भागात बिबट्या सतत आढळतो. ऊसासह जास्ती दाटीचे पीक असलेल्या भागात बिबट्या त्रासदायक ठरत आहे. संगमनेर तालुक्यातील वनकुटे येथे चार दिवसापुर्वी बिबट्याच्या या प्रकाराची सर्वदुर चर्चा होत आहे. 

---

हे वाचा ः # Rainy weather is developing in the state राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे

----

वनकुटे गावाजवळ असलेल्या कळमजाई या वस्तीवर दोन दिवसापुर्वी प्रकाश रेवजी हांडे या शेतकऱ्याचा शेतीला जोडून शेळीपालनाचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे हांडे यांनी शेळ्या गोठ्यात कोंडल्या. मात्र दरवाजा उघडा राहिला. रात्री साडेबारा वाजता भक्ष्याच्या शोधात या भागात भटकत आलेला बिबट्या शेळ्याच्या गोठ्यात शिरला. शेळ्या ओरडण्याच्या आवाजाने हांडे जागे झाले आणि त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता त्यांना तेथे बिबट्या  दिसला. बिबट्याने लगेच हांडे यांच्याकडे धाव घेतली. मात्र त्यांनी तातडीने तत्परता दाखवत दाराची कडी लावून घेतली आणि बिबट्या शेळ्याच्या खोलीतच कोंडला गेला. 

-----

 हे वाचा ः # Increased production in kharif due to change in planting and management लागवड, व्यवस्थापनातील बदलातून खरिपात उत्पादनवाढ

----

प्रकाश हांडे यांनी शेळ्याच्या खोलीत बिबट्या कोंडल्याची वार्ता साऱ्या गावांत पसरली. लोक जमा झाले. वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी आले. त्यांनी बिबट्याला पकडले. हांडे यांच्यामुळे या भागात धुमाकुळ घालणारा बिबट्या पकडला गेला खरा, परंतु तो पर्यत हांडे यांच्या 8 शेळ्या बिबट्याने मारुन टाकल्या होत्या. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात या बाबीची सर्वत्र चर्चा होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu