Ad Code

# The weather department has said about the rain पावसाबाबत हवामान खात्याने सांगितले आहे

पुणे ः राज्यात साधारण महिनाभराच्या खंडानंतर पावसाचे आगमन झालेय. सोमवार दि. 16 रोजी रात्रीपासूनच मुर पाऊस सुरु झाला तर आज मंगळवार दि. 17 रोजी दुपारनंतर अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. अजून किमान चार दिवस पाऊस पडल असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे खरिप हंगामातील पीकांना ताकद मिळाली असून अनेक पीक वाया जाता जाता  वाचली असल्याने शेतकऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे.  (The meteorological department said it would rain for at least four days. As a result, kharif crops have gained strength and many crops have been wasted, creating a renaissance among farmers.)

महाराष्ट्रातील गेल्या महिनाभरापासून पाऊस गायब झाला. मुग, सोयाबीन, तुर, उडीदाची पीके यामुळे वाळू लागली. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी आता खरिप हंगामातील पिकांना मोठा फटका बसणार आहे. कसंतरी तग धरुन असलेली पीकेही पावसाअभावी वाया जाणार  असल्याच्या धास्तीने शेतकऱ्यांचे डोळे अकाशाकडे लागले होते. त्यात हवामान विभागाने 15 आॅग्सष्टनंतर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खाते व हवाान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. सुदैवाने शक्यता ही व्यक्त खरी ठरली आहे. सोमवार रात्री पासून पावसाची झड सुरु होती. मंगळवारी दुपारनंतर राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

हे वाचा ः # Silk farming जिद्दीने सुरु केलेली प्रशांत लगड यांची यशस्वी रेशीम शेती 

हवामान विभागाने यापुढे चार दिवस जोरदार पाऊस पडण्याच अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार बुधवार दि. 18 आॅगस्ट रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, बीड, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यामधील बहूतांशस भागात, गुरुवार दि. 19 आॅगस्ट रोजी पालघर, अमरावती, नागपूर जिल्ह्यात, शुक्रवार दि. 20 आॅगस्ट व शनिवार दि. 21 आॅगस्ट रोजी संपूर्ण राज्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या अनेकक दिवसापासून गायब झालेला पाऊस पुन्हा सुरु झाल्याने शेतकऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यभर सध्या ढगाऴ वातावरण आहे. पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याचीही आशा निर्माण झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu