Ad Code

# Abdul Sattar and Radhakrishna Vikhe Patil राजकारणात आता कोतेपणा चे लोक आले आहेत : राधाकृष्ण विखे पाटील

नगर, : राज्यात शिवसेना-भाजपचा संघर्ष पाहायला मिळत असताना नगर जिल्ह्यात 
मात्र विकास कामाच्या निमित्तानं शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि 
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील राहाता तालुक्यातील कोल्हार येथे 
एका व्यासपीठावर लोकांना पाहायला मिळाले. केवळ एका व्यासपीठावर 
पाहायलाच मिळाले नाही तर दोघांनी एकमेकांची तोंड भरून स्तुती केली. 

महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार हे माझे जुने मित्र आहेत. आम्ही राजकारणाच्या 
पलिकडे मैत्री जपतो आणि विकास कामे करतांना राजकारणापलीकडे आम्ही विचार करणारे 
लोक आहोत. अलीकडे कोणी कोणाला भेटले तरी लगेच त्याची चर्चा होते. 
आता राजकारणात अस्पृश्यता निर्माण झाली असल्याची खंत व्यक्त करत,
 राजकारणात आता कोतेपणाचे लोक आले आहेत. काही लोक फक्त हसत राहतात. 
हसत राहून दुसऱ्याला गुदगुल्या करणारे मंत्री आमच्या जिल्ह्यात मंत्री आहेत असे
 आमदार राधाकृष्ण विखे म्हणाले

राहता तालुक्यातील कोल्हार येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री अब्दुल सत्तार आणि
 आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी झालेल्या 
भाषणबाजी तर चांगलीच टोमणे बाजी एकमेकांना मारत गेले.
 विखे पाटील म्हणाले राज्य सरकारबद्दल मी काही बोलणार नाही 
 मात्र मुख्यमंत्र्यांना मंदिरे खुली करायला सांगा. माॅल उघडले,
 रेस्टारंट उघडले, लोकल सुरू झाली आता मंदिरी सुरू व्हायला 
काय हरकत आहे. अब्दुल सत्तार यांनीही विखे पाटलांचे कौतूक केले ते म्हणाले माझ्या मतदारसंघात 
आता शिवसेना वाढत आहे. पूर्वी काँग्रेसचा तिथे मतदार जास्ती होता. 
मीही सरपंचपदापासून राजकीय कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे 
ग्राम विकासाचा मला चांगला अनुभव आहे काँग्रेसमध्ये विखे पाटील असताना 
आम्ही विखे पाटील हे आधी द्यायचे आणि आम्ही तो आदेश मानायचो. 
विखे-पाटील यांनी कधीही जातीपातीचा विचार केला 
नाही. मी विखे पाटलांचा कार्यकर्ता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu