Ad Code

# Atrocity अॅट्रासिटीची गैरवापर थांबवा, संभाजीराजे दहातोंडे पाटील. मराठा महासंघाचे पदाधिकारी गृहमंत्री, पोलिस महासंचालकांना भेटणार ः

नगर, ः मराठा समाजाने कायम इतर सर्वच समाजाला आधार देण्याचे काम केले आहे. मराठा समाजाकडून कधीही जातीवाद केला जात नाही. मात्र काही लोक मराठा समाजाला जाणीवपुर्वक टार्गेट करत असून अॅट्रासिटी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे नगर जिल्ह्यातील अलिकडच्या घटनांतून दिसत आहे. हा गैरवापर थांबवावा अशी मागणी मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे पाटील यांनी केली आहे. याबाबत गृहमंत्री, पोलिस महासंचालकांची भेट घेऊन नगर जिल्ह्यातील अॅट्रासिटीच्या गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

(The recent incidents in Nagar district show that the Maratha community is being deliberately targeted and the Atrocities Act is being misused. Maratha Federation leader Sambhaji Dahatonde Patil has demanded to stop this abuse. He said that the Home Minister would meet the Director General of Police and demand an inquiry into the atrocity case in Nagar district.)

शेतकरी मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदावर फेरनियुक्तीसह आखिल मराठा महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी व राज्य संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल नगर जिल्हा  मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दहातोंडे यांचा सत्कार केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना दहातोंडे म्हणाले, वंचित घटकातील अल्पसंख्याकावर अन्याय होऊ नये यासाठी अॅट्रासिटी कायदा केला, मात्र आता या कायद्याचा खोटा वापर करुन मराठा व इतर खुल्या प्रवर्गातील लोकांवर काही लोकांकडून अन्याय केला जात आहे. 


अलिकडच्या काळातील शेवगाव, नगर, पारनेर व अन्य काही दाखल झालेले गु्न्हे पाहता ते स्पष्ट होतेय. मराठा समाजाने कधीच जातीयवाद केला नाही. ग्रामीण भागात वंचित घटकांतील लोकांना जगवण्याचे काम केले. मात्र आता काही लोक जाणीवपुर्वक समाजा-समाजात तेढ निर्माण व्हावे या हेतुनेच जातीयवादी भाषा करत मराठा समाजाला टार्गेट करुन अॅट्रासिटीचा वापर करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यत झालेल्या गुन्हाची विशेष पथकांपमार्फत गुप्त पद्धतीने तपासणी करावी आणि खोटे गुन्हे मागे घेऊन असे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गृहमंत्री, पोलिस महासंचालक यांची भेट घेणार असल्याचे दहातोंडे म्हणाले. यावेळी महासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभिषेन खोसे, उत्तर जिल्हाध्यक्ष राज गवांदे, शेतकरी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर बोरुडे, शामराव पवार, रावसाहेब मरकड, संतोष पागिरे यांच्यासर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu