Ad Code

# It will rain again पुन्हा जोरदार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

 

नगर : 10 सप्टेंबर पासून पुढील चोवीस तासात बंगालच्या उपसागरातकमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. व  तो वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४८तासात कमी दाबाचा पट्टा अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवसात मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 
अहमदनगरसह राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडेल असे हवामान खात्याने सांगितले.  मागील आठवड्यातील जोरदार पावसानंतर पुन्हा एकदा हवामान खात्याने इशारा दिल्यामुळे शेतकरी सावध झाले आहेत.

 (A low pressure belt is likely to form in the Bay of Bengal. And it's likely to move west-northwest. Therefore, the low pressure belt is likely to intensify in the next 48 hours. Therefore, the meteorological department has forecast heavy and torrential rains in the next four-five days.)
नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात बहुतांश भागात पाऊस झाला. शेवगाव-पाथर्डी भागात सदृश्य तर पारनेर मधील काही भागातही अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  मात्र जोरदार पावसामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मुळा, भंडारदरा, निळवंडे व मुळा धरण अजून भरलेले नसले तरी पाण्याची आवक होत आहे. अहमदनगर सोबत शेजारच्या बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद लातूर, सोलापुर मध्ये ही मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला. 

आता चार पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आज पासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्‍यता आहे व तो पट्टा पुढील 48 तासात अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात तसेच राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.  

यामुळे नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी नदीकाठच्या लोकांनी दक्ष राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकही जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी दक्ष झाले आहेत. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu