Ad Code

#Inquiry into loss in Shirur Kasar taluka started शिरुर कासार तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

शिरूर कासार : शिरूर कासार तालुक्‍यात चार दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार श्रीराम बेंडे साहेब यांच्यासह महसूल मधील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली.  झालेल्या नुकसानीचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकामार्फत पंचनामे केले जात आहेत झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांनी माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.  


शिरूर कासार तालुक्‍यात या वर्षी अद्यापही पुरेसा पाऊस नव्हता त्यामुळे खरिपातील पिके तशी अडचणीतच होती. पोळ्या नंतर पावसाचे प्रमाण कमी होते असे जुने लोक सांगतात. मात्र यावर्षी पोळ्याच्या आधी जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यात समाधान व्यक्त केले जात आहे चार दिवसापूर्वी सिंदफणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने वरील सर्व धरणे भरून सिंदफणा धरण ओव्हरफ्लो झाले व सिंदफना नदीला मोठा पूर आला याशिवाय सातत्याने जोरदार पाऊस पडल्यामुळे या पावसाने शेतात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाली आहे. 


या नुकसानीचे तहसीलदार श्रीराम भेंडे साहेब व त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर आता नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत.  नुकसानीचे पंचनामे करतेवेळी कोळवाडी शिवारात (तहसीलदार)  श्रीराम बेंडे साहेब तसेच गावचे  (तलाठी) शब्बीर पठाण , (ग्रामसेवक) खाकाळ साहेब, कृषी सहाय्यक लाड साहेब, युवक नेते साईनाथ नेटके, नारायण मानकर (उपसरपंच) , देविदास नेटके, सोनाजी मानकर, ग्रामपंचायत सदस्य मीठु नेटके, महेश गिरी, चंद्रकांत नेटके,  खुशालराजे नेटके, आप्पासाहेब पवने यांच्यासह गावकरी उपस्थित होते. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu