Ad Code

# Maratha Federation मराठा महासंघाच्या नवीन जबाबदारया मिळाल्याने संभाजीराजे दहातोंडे यांचा जाहीर सत्कार

नगर, ः अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य संपर्कप्रमुख व उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी तसेच शेतकरी मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संभाजीराव दहातोंडे यांचा आज दि. 11 रोजी शनिवारी अहमदनगर येथील सरकारी विश्रामगृहावर जाहीर सत्कार करण्यात आला. 

Sambhajirao Dahatonde has been elected as the State Liaison Officer of All India Maratha Federation and North Maharashtra Divisional President as well as State President of Shetkari Maratha Mahasangha. A public reception was held at the Government Rest House in Ahmednagar on Saturday the 11th.

यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमाला महासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभिषेन खोसे, उत्तर जिल्हाध्यक्ष राज गवांदे, शेतकरी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर बोरुडे, शामराव पवार, रावसाहेब मरकड, शहाजी कोळसे, ललित मोरे, अमोल मांगुडे, दिलीप थोरात, अनिकेत कराळे, नाना डोंगरे, प्रफुल्ल काळे, सतीश मस्के, सतीश पठाडे, पुरुषोत्तम सोमवंशी, राजेंद्र मस्के, डाॅ. प्रमोद साप्ते, महेंद्र ढमाले, निलेश पेरणे, सुनील निमसे, डाॅ. ज्ञानदेव कोरडे, भाऊसाहेब वाकचौरे, दिलीप थोरात, सतीश पठाडे, अनिकेत कराळे, सुनिल देवकर, दत्ता शिंदे, ज्ञानेश्‍वर फसले, पुरुषोत्तम सुर्यवंशी, राजेंद्र  संतोष हंबर, डॉ. ज्ञानदेव कोरडे, वैभव ठाणगे, बाळासाहेब सालके, चौधरी, ठाणगे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थिती होते. 

हे वाचा ः # Atrocity अॅट्रासिटीची गैरवापर थांबवा, संभाजीराजे दहातोंडे पाटील. मराठा महासंघाचे पदाधिकारी गृहमंत्री, पोलिस महासंचालकांना भेटणार ः

दहातोंडे म्हणाले, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची भूमिका काय? यासंदर्भात संपुर्ण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. मात्र राज्यातील काही राजकीय मंत्री मराठा आरक्षणाला विरोध करीत आहे. अशा मंत्र्याच्या विरोधात मराठा महासंघाच्या वतीने ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणावरुन बेताल वक्तव्य करीत आहे. 

यामुळे दोन समाजात दरी निर्माण केली जात आहे. हे बेताल वक्तव्य काँग्रेसच्या दृष्टीने धोक्याचे असल्याचे सुचक वक्तव्य अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांनी केले. तर वडेट्टीवार यांचे बेताल वक्तव्य न थांबल्यास थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरावर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मोर्चा काढणार आहे. काढण्याचा इशारा त्यांनी दिला. सत्तेसाठी राजकारण नसून, मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करत आहे. 

मराठा महासंघाच्या स्थापनेला 120 वर्षे झाले असून, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. मराठा महासंघाच्या मुख्य कार्यालयाची मुंबई, गीरगावला इमारत बांधली जात असल्याची माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आलेली जबाबदारी निश्‍चितपणे पेळवली जाणार आहे. मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत पवार यांनी मोठा विश्‍वास दाखवून महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu