Ad Code

# Reserves मराठवाड्यासाठी दिलासादायक, भंडारदरा भरणार, जायकवाडीत पाणी जाणार


                             
अहमदनगर : मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. असाच पाऊस राहिला तर दोन दिवसात भरेल आणि पाणी निळवंडेतून प्रवरा नदीतून जायकवाडीत जाईल. त्यातच चार-पाच दिवस जोरदार पाऊस सांगितलेला असल्याने जायकवाडी भरण्याची आशा उंचावली आहेत  ११ टीएमसी क्षमतेच्या भडारऱ्यात धरणात सव्वा दहा टीएमसी पाणीसाठा झाला असून, साडेदहा टीएमसी पाणी झाल्यानंतर पाणी सोडले जाणार आहे. 

मराठवाड्यासाठी वरदान असलेले जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. नाशिक भागात होणाऱ्या जोरदार पावसावर हे अवलंबून आहे, तसेच ते नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पावसावरही अवलंबून आहे. या  दोन भागातील पाणलोटातील पाण्यावरच जायकवाडी भरते. नाशिक जिल्ह्यातील बहूतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय पाऊस सुरु असल्याने गोदावरीतून पाणी येत आहे. नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यात सर्व बाजूने पाणी जमा होते. व ते पाणी गोदावरीतून जायकवाडीत जाते. गोदावरीत सध्या पाणी सोडले जात असून अजून त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. 

नगर जिल्ह्यातील अकोले तालु्क्यातील भंडारदरा धरण हे इंग्रजांनी बांधलेले आहे. हे धरण 15 आॅगस्टच्या आत भरत असते. यंदा मात्र पाऊस नसल्याने हे भरले नाही. 85 टक्क्यावर पाणीसाठा धरणात स्थीर होता. तीन दिवसापासून मात्र या भागात पाऊस पडत असल्यान् धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे एक-दोन दिवसात पाणी सोडले जाऊ शकते. हे पाणी नळवंडेत येते. निळवंडेही 80 टक्के भरलेले आहे. त्यामुळे त्यातूनही प्रवरा नदीत पाणी सोडले जाऊ शकते. 

हरिचंद्रगड पट्ट्यातील पावसामुळे मुळा नदीत जोरात पाणी येते आहे. मुळा धरणात सध्या 82 टक्के पाणी आहे. त्यामुळे हे धरणही भरण्याची आशा आहे. सर्व बाजून धरणे भरुन पाणी सोडले गेले तर जायकवाडीतही चांगला पाणी साठा होईल. त्यामुळे नगर, नाशिक भागातील पाऊस जायकवाडी आणि मराठवाड्यासाठी दिलासा देणारा आहे. पुढील तीन-चार दिवस जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असल्याने लोकांनी काळजी घेण्याचे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu