Ad Code

Sambhaji Dahatonde Patil संभाजी दहातोंडे पाटील यांच्यावर मराठा महासंघाची नवी जबाबदारी

नगर ; अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील यांच्यावर आता महासंघाने नवी जबाबदारी दिली आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रा. शशिकांत पवार यांनी संभाजीराजे दहातोंडे पाटील यांची राज्य संपर्कप्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे यामुळे त्यांच्याकडे आता मराठा महासंघाच्या तीन प्रमुख जबाबदाऱ्या आल्या आहेत. 

(In the recent meeting held in Mumbai, the president of the All India Maratha Federation, Pvt. Shashikant Pawar has chosen Sambhaji Raje Dahatonde Patil as the state liaison chief and North Maharashtra divisional president, so he now has three major responsibilities of the Maratha Federation.)

नगर जिल्ह्यातील चांदा (ता. नेवासा) येथील मूळ रहिवासी असलेले व  छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार  माणकोजी दहातोंडे यांच्या वंशातील संभाजीराजे दहातोंडे पाटील गेली वीस ते तीस वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघ आत काम करत आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी पाच वर्ष चांगले काम केले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघात  अहमदनगर जिल्हा अध्यक्ष,  प्रदेश उपाध्यक्ष, राज्य संपर्कप्रमुख अशा प्रमुख जबाबदाऱ्या संभाळल्या नंतर गेल्या काही वर्षापासून ते महाराष्ट्र राज्य शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष आहेत. शेतकरी मराठा महासंघाच्या माध्यमातून दहातोंडे यांनी राज्यभरात भरीव काम केले  आहे. त्यामुळे मराठा महासंघाने त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे नुकतीच मुंबईत बैठक झाली या बैठकीत संभाजीराजे दहातोंडे पाटील यांच्यावर राज्य संपर्कप्रमुख तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी निवड केली आहे यामुळे त्यांच्याकडे आता मराठा महासंघाच्या तीन प्रमुख जबाबदाऱ्या आल्या आहेत. संभाजीराजे दहातोंडे यांच्या निवडीचे राज्यभरात स्वागत केले आहे. 

संभाजीराजे दहातोंडे यांना नव्या जबाबदारीचे  नियुक्तीपत्र देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार. दिलीपदादा जगताप, रणजीत जगताप, संतोष नानवटे, विरेंद्र पवार. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu