Ad Code

# Water from the dam into the Zepavale river basin धरणातून झेपावले नदीपात्रात पाणी (व्हिडीओ)

अकोले (जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्याचे लक्ष लागून अ्सलेले भंडारदरा धरण आज रविवारी दिपारी आकरा वाजता पुर्णपेणे भरले. त्यामुळे धरणातून साडेतीन हजार क्युसेकने पाणी सो़डले. काठोकाठ भरलेल्या धरणातून प्रवरा नदीत पाणी झेपावले. आता निळवंडेही लवकरच भरणार आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणी जायचा मार्ग मोकळा झाला आहे. पाऊस अजूनही सुरुच आहे. 

The Bhandardara dam, which has attracted the attention of Marathwada including Ahmednagar district, was fully filled on Sunday afternoon. As a result, three and a half thousand cusecs of water was released from the dam. Water flowed into the Pravara river from a dam filled to the brim. Now Nilwande will also be filling up soon. This has paved the way for water to flow into Jayakwadi. It is still raining 


जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण अखेर रविवारी (ता. १२) शंभर टक्के भरले. त्यामुळे दुपारी साडेआकरा वाजता धरणातून ३ हजार २५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दर वर्षी ९५ टक्के धरण भरल्यावर तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर करून विसर्ग केला जातो. यंदा मात्र १०० टक्के धरण भरल्यावरच (११ टीएमसी) विसर्ग सुरू केला. यंदा एक महिना उशिराने धरण भरले. अजूनही धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

 नगर जिल्ह्याचे, त्यातही खास करून अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, नेवासा तालुक्यांचे भंडारदरा, निळवंडे धरणांकडे तर राहुरी, पाथर्डी, नगर, नेवासा, तालुक्यातील लोकांचे मुळा धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष असते. दर वर्षी १५ ऑगस्टच्या आत भरणारे भंडारदरा धरण यंदा एक महिना उशिराने भरले आहे. ९५ टक्के धरण भरल्यावर तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याचे जाहीर करून विसर्ग केला जातो. यंदा मात्र १०० टक्के धरण भरल्यावरच विसर्ग सुरू केला.

भंडारदरा धरण भरल्याने लाभक्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. शिवाय पर्यटकांचीही गर्दी होऊ लागली आहे.याा भागात जोरदार पाऊस पडत असल्याने पावसाचा तसेच निसर्गाचा आनंद घेतला जात आहे. धरण भरल्याने लोकांची गर्दी होईल हे पाहून प्रशासन दक्ष झाले आहे. त्यात अजून चार-पाच दिवस जोरदार पाऊस सांगितला आहे. 

पहा ः भंडारदरा धरण भरल्यानंतरचा हा मोनमोहक व्हिडीओ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu