मुंबई ः अहमदनगर येथील कार्यतत्पर असलेले जिल्हा परिषदेतील प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकरी वासुदेव सोळंके यांची बीड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पदावर तर पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव यांची रत्नागिरी येथे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. दोनही अधिकाऱ्यांची पदोन्नतीवर बदली झाली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेतील उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदावरील राज्यातील २३ अधिकाऱ्यांच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पदावर पदोन्नतीवर बदल्या झाल्या आहेत. राज्यातील विकास सेवा गट अ मधील उपमुख्यकार्यकारी अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक या पदावर पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. बहूतांश बदल्या या रिक्त जागांवर करण्यात आल्याचे राज्यशासनाचे अवर सचीव डॉ. वसंत माने यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
बहुतांश बदल्या या जिल्हा परिषदेेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक या रिक्त पदावर झालेल्या आहेत. अहमदनगर येथील जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना वासुदेव सोळंके यांचे भरीव योगदान राहिले आहे. सोळंके यांनी यापुर्वी मराठवाड्यातही भरीव काम केले आहे. कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. बीड जिल्ह्यासाठीही चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल असे साळुंके म्हणाले.
परिक्षित यादव यांनी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदासोबत अहमदनगर येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी म्हणून काम केलेले आहे.
0 टिप्पण्या