Ad Code

# Onion price hike कांदा दराची ऊसळी, घोडेगावला चार हजाराच्या पुढे दर



नगर- नाशिक ः गेल्या वर्षभरापासून एकाच जागेवर स्थिर असलेले 
कांद्याचे दर गेल्या चार पाच दिवसापासून वाढू लागले आहेत. 
कांदा दराने आता चांगलीच उसळी घ्यायला सुरुवात केली असल्याचे ़
दिसत आहे. घोडेगाव (ता. नेवासा) येथील बाजार समितीत आज 
चांगल्या दराच्या कांद्याला प्रतिक्विंटल 4,100 रुपयाचा दर मिळाला. 
अहमदनगर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतही कांद्याला
 प्रति क्विंटल 3800 रुपयापर्यंत दर मिळाला. नासिक 
जिल्ह्यातील लासलगावसह अन्य बाजार समित्यात
 3500 रुपयांपेक्षा जास्ती दर मिळाला. 

(Good price onions
in the market committee at Ghodegaon (Tal. Nevasa)
today The rate was Rs 4,100 per quintal. Agricultural
Produce Market at Ahmednagar Onion also fetched
up to Rs 3,800 per quintal in the committee. In
Nashik district Other market committees,
including Lasalgaon, got more than Rs 3,500.)

अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक मराठवाड्यासह 
विदर्भातील काही भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन 
घेतले जाते. खरीप, रब्बी, आणि उन्हाळी तिन्ही हंगामात कांदा हे 
महत्त्वाचे पीक असल्याचे गेल्या काही वर्षातील कांदा लागवडी 
वरून दिसून येत आहे. मागील काही वर्षात कांद्याला चांगला दर 
नसल्याने तसेच वादळ पाऊस गारपीट यासारख्या नैसर्गिक 
आपत्तीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरीही 
शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे 
आकडेवारीतून दिसून येत आहे. गेल्या वर्षी कोरूना च्या 
काळामध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात 
पडले होते. त्यानंतर काहीशी कांदा दरात वाढ झाली मात्र 
गेल्या आठ-नऊ महिन्यापासून कांदा दर
 1800 ते 2 हजार रुपयांवर स्थिर होते. चांगल्या कांद्याला 
1800  ते 2000 हे दर चांगल्या कांद्याचे असले 
तरी सरासरी शेतकऱ्यांच्या कांद्याला पंधराशे ते सोळाशे
 रुपयाचा दर बाजारात मिळत होता. 

दरवाढीची अपेक्षा ठेवत शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला 
मात्र दर वाढत नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आता गावरान 
उन्हाळी कांदा विक्री केलेला आहे आता मात्र चार ते पाच दिवसांपासून 
कांदा दराने उसळी घेतली आहे. गेल्या आठ दिवसात कांद्याच्या 
वाढ झाली असून आज सोमवार दि. 4 रोज 
घोडेगाव  येथे चार हजार 100 रुपयाचा प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. 
नगर बाजार समितीत ही तीन हजार 800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर 
मिळाला तर खरिपातील लाल कांद्याची आवक 
सुरू झाली असून लाल कांद्याला दोन हजार 400 रुपयांपर्यंत 
प्रति क्‍विंटल दर मिळाला असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील 
लासलगाव, येवला अन्य भागातही कांद्याला साडेतीन हजार 
रुपयांपर्यंतचा दर मिळाला.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu