Ad Code

# Eight people, including farmers, were killed लखीमपुर-खरीच्या घटनेत शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झालाय

उत्तरप्रदेश ः उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया येथे एका नेत्यांच्या वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडले. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वाहनांना आग लावली. य हिंसाचारात एकून आठ लोकांचा झालाय. या घटनेने लखीमपुर भागात तणाव असून तिकडे जाणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी तिकडे जाण्यापासून रोखले आहे. या जिल्ह्यातील राहिवासी असलेले केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलावर वाहने शेतकऱ्यांच्या  अंगावर घातल्याचा  आरोप होत आहे. मंत्री मिश्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. 

(Four farmers were crushed by a leader's vehicle at Tikonia in Uttar Pradesh's Lakhimpur Kheri district. The enraged farmers then set the vehicles on fire. A total of eight people have been killed in the violence. The incident has created tension in Lakhimpur area and police have stopped the leaders of various parties from going there.)

उपमुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे  झेंडे दाखवण्यासाठी उत्तरप्रदेशातील तिकोनिया येथे शेतकरी जमले होते. यावेळी अंदोलन करणाऱ्यांवर केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन नेल्याचा आरोप केला जात आहे. यात शेतकरी चिरडले गेले, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 

शेतकरी चिरडल्याचे दिसताच अंदोलन अधिक संतप्त झाले त्यांनी तीन वाहनांना आगी लावल्या. या हिंसाचारात एकून आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सह विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी लखीमपुर खरीत जाण्यापासून रोखले. त्यातूनही पोलिसांची नजर चुकवून गांधी लखीमपुर खेरीत दाखल झल्यावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

घटनेनंतर दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी अंदोलनाचे नेते राकेश टिकैत हे लखीमपुर खरीला जाणार आहेत. माजीमुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही भाजपवर टिका केली आहे. निवडणूकीच्या तोंडावर शेतकरी अंदोलनाच्या निमित्ताने उत्तरप्रदेशाचे राजकारण तापणार आहे. 

या प्रकारानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी  आपले नियोजीत दौरे, कार्यक्रम रद्द केले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे  आदित्यानाथ यांनी सांगितले आहे. या भागात तणाव असून पोलिस, सीआरपीएफ चा कडक बंदोबस्त ठेवला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu