Ad Code

#दर्पण दिन : विद्यार्थ्यांनी घेतली पत्रकारांची शाळा



शेवगाव : मोठमोठ्या पुढाऱ्यांना बेरकी प्रश्न विचारून त्यांची फिरकी घेणाऱ्या पत्रकारांनाच अभ्यासपूर्ण व खोचक प्रश्न विचारून त्यांचीच शाळा घेण्याचे काम केलेय ते चिमुरड्या विद्यार्थ्यांनी... ! निमित्त होते पत्रकार दिनामित्त आयोजित पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे ! 

               बोधेगाव (ता. शेवगाव ) येथील रेणुकामाता बहुद्देशीय शैक्षणिक संस्थेच्या सनराईज पब्लिक स्कूल, ब्राईट फ्युचर कॉलेज व आरोही माध्यमिक विद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यानीच उपस्थित पत्रकारांची मुलाखत घेऊन त्यांना बोलते करण्याचे काम केले.

          यावेळी विद्यार्थ्यांच्या खोचक प्रश्नांना तेवढीच समर्पक व विद्यार्थांना कळतील अशा भाषेत उत्तरे उपस्थित पत्रकार सर्वश्री अनिल ऊर्फ बाळासाहेब कांबळे, जयप्रकाश बागडे, शंकरराव गुठे, रामेश्वर तांबे यांनी दिल्याने विद्यार्थांचे समाधान झाले. या कार्यक्रमाला पत्रकार बाळासाहेब खेडकर, संजय सुपेकर, उद्धव देशमुख, इसाक शेख, पांडुरंग निंबाळकर, शहादेव साखरे, आसिफ पठाण यांच्यासह श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक तथा रेणुकामाता बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रमेश गर्जे, प्राचार्य राकेश गर्जे, मुख्याध्यापिका प्रतिभा कुटे, महेश गरड, आयुब शेख, अमोल शिरसाठ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू माळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार जैनुद्दीन शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu