Ad Code

#ऊस तोडणी करिता शेतकऱ्यांची पिळवणुक : जागरण गोंधळ आंदोलनाचा मनसेचा इशारा

शेवगाव  :  ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी करून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.मोठ्या प्रमाणावर ऊस क्षेत्र असलेल्या गावात ऊस तोडीसाठी ऊसतोड कामगारांच्या न देता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्याकडून एक प्रकारे अडवणूक सुरू आहे.येत्या आठ दिवसात या परिस्थितीत बदल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा संबंधित कारखाने चालविणा-याच्या घरासमोर जागरण गोधंळ आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी दिला आहे.


ऊस पीक चांगले नाही,ऊस पडलेला आहे,ऊस क्षेत्र अडचणीचे आहे,तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगुन ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास ती रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी खबरदारी घ्यावी.शेतकऱ्यांना यासंदर्भात तक्रार करण्यासाठी कारखान्याने मोबाईल फोन किंवा व्हॉटसॅप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत.


कारखाना प्रशासनातील अधिकारी फोन उचलत नाहीत.याबाबत कारखाना प्रशासनाने कार्यवाही करत ऊसतोडणीसाठी कमी 'टोळ्या' असलेल्या ठिकाणी कारखाना प्रशासनाने योग्य तो तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ संबंधित कारखाना प्रशासनाशी भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहे.मात्र यावर कुठल्याही प्रकारे तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. मनसेचे प्रमुख पदाधिकारी गोकुळ भागवत,रामेश्वर बलिया,संजय वणवे,सागर आधाट,लक्ष्मण अंभग,गोरख कौसे,हरिभाऊ केसभट,ज्ञानेश्वर कुसळकर आदि पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ  सर्व साखर कारखाना प्रशासनाशी चर्चा करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu