Ad Code

#माजी आमदार घुले : शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून केलेल्या प्रयत्नांचे चीज झालेशेवगाव  : मागील कित्येक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बोधेगाव (ता.शेवगाव) येथील काशी नदीवर बांधण्यात आलेले चार कोल्हापूर पद्धतीचे साखळी बंधारे निसर्गाच्या कृपेमुळे पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाले आहे.याचा परिसरातील शेकडो हेक्टर शेतीला फायदा होणार आहे.त्यांमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह पाहून केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले आहे असे भावोद्गार माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी काढले.
               बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी टिकून असुन अनेक शेतकऱ्यांना विविध पिकांमधून दुष्काळात चांगले उत्पन्न घेणे शक्‍य झाले आहे.माजी आमदार घुले पाटील यांनी आज(सोमवार) बोधेगावच्या काशी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याची पाहणी करत पाणी पुजन केले.त्यानंतर गोरे वस्तीवर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पवार,बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे,रामनाथ राजपुरे,अस्मानराव घोरतळे,राम अंधारे,भाऊराव भोंगळे,ज्ञानदेव घोरतळे,जिल्हा बँकेचे शाखा निरीक्षक भगवान निकम,बोधेगाव जिल्हा बँकेचे शाखाधिकारी के.के कोल्हे,बोधेगाव सेवा संस्थेचे सचिव अर्जुन राजपुरे,तालुका नोकरांची सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबा झांबरे,लाभधारक शेतकरी नवनाथ खोले,संजय कासुळे,दिलीप खोले,धनशाम कासुळे,लक्ष्मण घोरतळे उपस्थित होते.
              यावेळी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी माजी आमदार घुले यांचा शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करत आभार व्यक्त केले.परिसरातील शेतकरी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu