Ad Code

#कोरोना अपडेट : निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर  :  को‍विड - १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सक्त सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी संबंधित यंत्रणाना आज दिल्या.कोविड आजाराची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्‍हा प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाय योजनांचा आढावा जिल्‍हाधिकारी डॉ.भोसले यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.डॉ. भोसले यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या  सभागृहात ही बैठक आयोजित करण्‍यात आली होती.

            या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर,मनपा आयुक्त शंकर गोरे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामटेके,मनपा वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका आरोग्‍य अधिकारी दूरदृष्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.
            बैठकीत जिल्‍हाधिकारी डॉ.भोसले यांनी जिल्‍‍ह्यातील प्रशासकीय व आरोग्‍य यंत्रणांच्‍या कामकाजासंदर्भात माहिती घेऊन तालुक्यातील लसीकरणाचे आणि कोविड चाचणीचे प्रमाण वाढविण्‍यासाठी सुचना दिल्‍या.राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडुन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू केलेल्या आदेशाप्रमाणे सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवून निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.कार्यालयांमध्ये पूर्व परवानगी शिवाय अभ्यागतांनी येऊ नये याचेही पालन झाले व्हावे.महानगरपालिका,नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीत निरीक्षक पथक नेमणूक हॉटेल उपाहारगृहांकडून वेळेचे उल्लंघन होते का? याची तपासणी करावी.दुकाने आणि आस्थापना मालक यांचे पूर्ण लसीकरण  झालेबाबतची पडताळणी करावी तसेच माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत सर्वेक्षण करावे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu