Ad Code

#सावधान कोरोना वाढतोय : अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी ५५७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

अहमदनगर :  जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत गुरुवार(ता.१३) रोजी मोठी वाढ झाली.दिवसभरात ५५७ नवीन रुग्ण वाढले असुन अहमदनगर शहरात सर्वाधिक १९४ रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १८३ , खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २९४ आणि अँटिजेन चाचणीत ८० रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ चिंताजनक आहे.
             १९४ रुग्ण आढळून आल्याने नगर शहर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.दुसऱ्या नंबरला राहाता तालुका असुन तिथे ४६ रुग्ण आढळून आले आहेत.नगर तालुक्यात ३९, कोपरगाव २५ , श्रीरामपुर २२, श्रीगोंदा २९, राहुरी १६, नेवासा व संगमनेर प्रत्येकी १४, पाथर्डी १२, शेवगाव ११, अकोले व पारनेर प्रत्येकी १०, जामखेड व कर्जत प्रत्येकी ४, भिंगार ५ तर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ४२ रुग्ण ,बाहेरील जिल्ह्यांतील ३४, तर परराज्यांतील २६ रुग्ण आढळून आले आहेत.
        दरम्यान,  संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे मात्र, रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून येत असल्याचे दिसुन येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu