Ad Code

#शाळा खोल्या बांधकाम प्रकरणी बोधेगावचे ग्राम विकास अधिकारी काटेंचे निलंबन : यापुर्वी विस्ताराधिकारी कराड,केंद्रप्रमुख ढाकणे व शाखा अभियंता पट्टे यांचे निलंबन

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मालकी ऐवजी इतर मालकीच्या जागेवर शाळा खोल्याचे बांधकाम केल्याप्रकरणी शुक्रवारी(ता.१४) पुन्हा एका अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केले.महाराष्ट्र शासनाची जागा असतानाही ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे नियमबाह्य केल्याचा ठराव करून जिल्हा परिषद सेवा (वर्तणुक) नियम १९६७ (३) चा भंग केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी बोधेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे यांचे निलंबनाचे आदेश काढले. याच प्रकरणात आधी शेवगावचे पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा भातकुडगावचे विस्ताराधिकारी रामनाथ कराड,बोधेगावचे केंद्रप्रमुख रामराव ढाकणे व जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता जयेंद्र पट्टे यांचे निलंबन झाले होते.आता चौथ्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने शेवगाव तालुक्याचे एकच खळबळ उडाली आहे.


बोधेगाव(ता.शेवगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे मंजुर बांधकाम विनापरवानगी जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी इतर मालकीच्या जागेत बांधकाम केले आहे.ही बाब जिल्हा परिषद सेवा (वर्तणुक) नियम १९६७ (३) चा भंग करणारी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अधिकारी कराड,केंद्रप्रमुख ढाकणे व शाखा अभियंता पट्टे यांचेवर शिस्तभंग कारवाई निश्चित करत त्यांचे सोमवार(ता.१०) रोजी निलंबन आदेश जारी केले होते.निलंबन काळात वरील तिघांना नेवासा मुख्यालय देण्यात आले असुन नेवासा गट शिक्षणाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेश दिले होते.


महाराष्ट्र शासनाची जागा असतानाही ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे नियमबाह्य केल्याचा बोधेगाव ग्रामपंचायत मासिक ठराव क्र.५/२,दि.२९/०२/२०२० रोजी नियमबाह्य ठराव करून तसे कळवून कर्तव्याचे पालन न केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषद सेवा (वर्तणुक) नियम १९६७ (३) चा भंग केल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी बोधेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे यांचे निलंबनाचे आदेश काढले.निलंबनानंतर ग्रामविकास अधिकारी काटे यांना कोपरगाव पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.कोपरगावच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय काटे यांना मुख्यालय सोडता येणार नसुन या काळात त्यांना खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही.तसे प्रमाणपत्र शेवगावच्या गट विकास अधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेशात नमुद आहे.जिल्हा परिषदे ऐवजी इतर मालकीच्या जागेवर शाळा खोल्याचे बांधकाम केल्याची तक्रार बोधेगावचे माजी सरपंच राम अंधारे यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती.


दरम्यान,एकाच आठवड्यात शेवगाव पंचायत समितीचे चार अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu