Ad Code

#अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची वाटचाल हजारांकडे : नगर शहरात त्रिशतकाकडे वाटचाल,राहाता शतकापार

अहमदनगर :  जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत सलग काही दिवसांपासुन वारंवार मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे.रविवार(ता.१६) दिवसभरात तब्बल ८४७ नवीन रुग्ण आढळून असुन अहमदनगर शहरात सर्वाधिक २८० रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३१८ , खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३८७ आणि अँटिजेन चाचणीत १४२ रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांमुळे जिल्ह्याच्या चिंतेत मोठी भर पडत चालली आहे.

             २८० रुग्ण आढळून आल्याने नगर शहर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यात नगर शहर प्रथम क्रमांकावर आहे.दुसऱ्या नंबरला राहाता तालुका असुन तिथे १०९ रुग्ण आढळून आले आहेत.अकोले ६२ , श्रीरामपुर ५२ , नगर ग्रामीण ४८ , भिंगार ४७ , कोपरगाव ३६ , राहुरी २९ ,पारनेर २८ , संगमनेर २७ , श्रीगोंदा २६ , पाथर्डी २३ , नेवासा १७ , जामखेड ०९ , कर्जत ०३ , शेवगाव ०३ तर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ०८ रुग्ण ,बाहेरील जिल्ह्यांतील ३४ तर परराज्यांतील ०६ रुग्ण असे एकुण आढळून आले आहेत.

        दरम्यान,  संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे मात्र, रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असुन नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu