Ad Code

तालुका स्तरावर 'कोवीड केअर' सेंटर सुरू करावेत - जिल्हाधिकारी डॉ.भोसले : कोरोना आढावा बैठक संपन्न

अहमदनगर  :  दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडदे आदी अधिकारी अहमदनगर येथून तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.


जिल्हाधिकारी डॉ.भोसले पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कोवीड रूग्णांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे.दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढविली  पाहिजे‌.दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या पण लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे.अशा ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा आरोग्यकाधिकारी सांगळे म्हणाले की , शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील रूग्ण पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे‌.यासाठी कोवीड नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर द्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu