शेवगाव : येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.म. गांधी यांच्या प्रतिमेचे प्राचार्य बालाजी गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यालयाच्या मैदानावर स्वच्छता केली.
म.गांधी पुण्यतिथी निमित्त प्रार्थना गायन,सत्कृत्य,स्वच्छता,वकृत्व स्पर्धा,हस्त उद्योग आदी उपक्रमाचे आयोजन विद्यालय पातळीवर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन विद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख संजय देवढे,सचिन दहिफळे,रामनाथ काळे यांनी केले.यावेळी विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या