Ad Code

#कोरोना संकट : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध - शाळा बंद,दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू

 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध ; शाळा बंद,दिवसा जमावबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाची साखळी तुटावी या करिता राज्य सरकार कडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

ही आहे नवी नियमावली –

१) रात्री  ११ ते सकाळी  पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी  तर असलेला नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. रात्री फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

२) राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली असुन पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

४) सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध. आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक असेल.

५) खासगी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम. ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही.

६) लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी  तर अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी.

७) सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी.

८) १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद.

९) स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद.

१०) हेअर कटिंगची दुकानं ५० टक्के क्षमतेने सुरू.रात्री १० ते सकाळी पर्यंत बंद राहणार.

११) पर्यटन स्थळं बंद. पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क  पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

१२) शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू.

१३) रेस्टॉरंट ५०  टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री १० ते पहाटे ५  हॉटेल  बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे.

१४) नाट्यगृह, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे( क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी).  अशा ठिकाणी सुद्धा संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी. मात्र रात्री १० ते सकाळी सिनेमागृहा  बंद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu