Ad Code

#नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांत मोठी वाढ : शुक्रवारी तब्बल नवीन आठशे रुग्णांची भर

अहमदनगर :  जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार(ता.१४) रोजी मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.आज दिवसभरात तब्बल ७९५ नवीन रुग्ण आढळून असुन अहमदनगर शहरात सर्वाधिक २०० रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३६० , खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ३१० आणि अँटिजेन चाचणीत १२५ रुग्ण आढळून आले आहेत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांमुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
             २०० रुग्ण आढळून आल्याने नगर शहर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.दुसऱ्या नंबरला राहाता तालुका असुन तिथे १३४  रुग्ण आढळून आले आहेत.अकोले,कोपरगाव तालुक्यात प्रत्येकी ५२ जणांना कोरोना लागण झाली आहे.नगर ग्रामीण मध्ये ४७, पारनेर ४६ , शेवगाव ३२, संगमनेर व श्रीरामपुर प्रत्येकी ३०, पाथर्डी २७, श्रीगोंदा २६, नेवासा २३ ,जामखेड १०, कर्जत ९, राहुरी ७, भिंगार ३ तर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ३७ रुग्ण ,बाहेरील जिल्ह्यांतील ३, तर परराज्यांतील ३ रुग्ण आढळून आले आहेत.
        दरम्यान,  संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे मात्र, रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असुन नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu