Ad Code

#चापडगावात भरदिवसा गोळीबार : दोन गाड्यावरून आलेल्या हल्लेखोरांनी हवेत फायर करून दहशतीचा प्रयत्न

शेवगाव  :  शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील भर मध्यवस्तीतील हायस्कुल चौकात दोन गाड्यावरून आलेल्या हल्लेखोरांनी गावातील एका तरुणांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली असुन या हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून दहशतही माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदर हल्ल्याला पारंपरिक वाद वा वाळू तस्करीची किनार असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात यापूर्वी वाळू तस्करीतुन खुन, मारामाऱ्या,जाळपोळ असे प्रकार घडले आहेत.काही वर्षांपूर्वी तर वाळू तस्करीतुन चक्क पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली होती.एकंदरीत या गोळीबार प्रकरणाने तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आज शनिवार(ता.२२) रोजी सकाळी दहाच्या सुमारास चापडगाव येथील हायस्कुल चौकात दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गावातील परमेश्वर उर्फ पप्पु बाळासाहेब पातकळ (वय २६) यांचेवर गोळीबार केला.त्यात पातकळ यांचे जीवितास कुठलाही धोका झाला नाही.यावेळी हवेत फायरिंग करत दहशत माजविण्याचाही प्रयत्न केला.यानंतर हल्लेखोर फरार झाले.या घटनेने गाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


दरम्यान, या घटनेला वाळू तस्करीची किनार असल्याची चर्चा आहे.तसे पाहता शेवगाव तालुक्याला वाळू तस्करी आणि त्यातुन पुढे आलेली गुन्हेगारी नवीन नाही.यातुनच खुन, खुनाचा प्रयत्न,मारामाऱ्या,जाळपोळी सारखे प्रकारही घडले होते.तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन कर्मचारी दीपक कोलते यांना आपला जीव गमवावा लागला होता.ही पार्श्वभूमी पाहता वाळू तस्करीतुन गुन्हेगारीने आपले डोके पुन्हा एकदा वर काढल्याचे दिसते आहे.


घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी पोहचले असुन पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu