Ad Code

#डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती,शिक्षण फी व परीक्षा फी साठी अर्ज व नुतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अहमदनगर  : 'महा-डीबीटी पोर्टल' च्या माध्यमातुन सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नुतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती अहमदनगर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.तसेच २०२०-२१ या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना त्रुटींची पुर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करणे यासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात.यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नुतनीकरण करण्यास यंदा १२ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजुनही सुरू आहेत त्यामुळे १२ जानेवारी पर्यंत काही विद्यार्थी डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत.याचाच विचार करून पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती,शिक्षण फी,परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नुतनीकरण करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन आयुक्त देवढे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu