Ad Code

#आमदार डॉ. तांबेंचा वाढदिवस 'पुस्तक मैत्री दिन' म्हणुन साजरा करणार

संगमनेर : जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांचा उद्या(ता.१७) रोजी होणारा वाढदिवस हार-तुरे ऐवजी 'पुस्तक मैत्री दिन' म्हणुन साजरा केला जाणार आहे. डॉ.तांबे यांचेवर प्रेम करणारे कार्यकर्ते,नातेवाईक,मित्र परिवार यांनी जयहिंद लोकचळवळीच्या कार्यालयात पुस्तके भेट देऊन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन जयहिंद युवा मंचने केले आहे.


नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे हे शेती,सहकार,सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत.संगमनेर येथे तीस वर्षांपूर्वी त्यांनी मूकबधिर व देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला.संगमनेर नगराध्यक्ष ते विधानपरिषद सदस्य असा प्रवास करत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातुन राज्यात युवकांची फळी उभी करत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.२००९ मध्ये प्रताप सोनवणे लोकसभेवर निवडुन गेल्यानंतर रिक्त झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळविला होता.त्यावेळी अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामांमुळे २०१० मध्ये सुमारे ३४ हजार मतांच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला होता.माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे डॉ. तांबे मेव्हणे आहेत.पुढे २०१६ ला झालेल्या निवडणुकीतही त्यांनी लक्षणीय मते मिळवीत मतदारसंघातील सलग तिसरा विजय संपादन केला.


पुढे अपंग, मुकबधीर,अंध व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करत 'नेता नव्हे मित्र' अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली.स्वतः वाचनप्रेमी असलेल्या डॉ.तांबे यांनी संगमनेरसह जिल्ह्यात ग्रंथालय चळवळीस मोठा हातभार लावल्याने यंदा आपला वाढदिवस 'पुस्तक मैत्री दिन' म्हणुन साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.पोस्टर,होर्डिंग्जला फाटा देत हार,शाल,फेटे यावरील अनावश्यक खर्च टाळत त्याऐवजी विविध ग्रंथालये,शाळा यांना पुस्तके भेट देऊन सामाजिक उपक्रमांनी चालना मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी आपले नाव व मोबाईल नंबर टाकुन सदर पुस्तके संगमनेरस्थित आपल्या 'यशोधन' कार्यालयात जमा करावे , असे आवाहन जयहिंद युवा मंचने केले आहे.त्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वाचनालय विभाग ( मो. ९८२२८४७६०७ ) व  उद्योग/ स्वयंरोजगार विभागाशी ( गणेश थोरात मो. ९९६००२६८५२ ) संपर्क करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu