Ad Code

#गुलाबी थंडी आणि दाट धुक्यात हरवले बोधेगाव

शेवगाव  :  'गुलाबी थंडी आणि दाट धुके' असे मनमोहक वातावरण शेवगाव तालुक्यासह बोधेगावकरांनी आज अनुभवले असुन वातावरणाततील गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र होते.रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना देखील आपले वाहन अत्यंत धीम्या गतीने चालवावे लागत होते.सकाळी नऊ वाजले तरी देखील येथील धुक्याचे चित्र कायम असल्याचे पहावयास मिळाले. थंडी आणि दाट धुके' असे मनमोहक वातावरण शेवगावकरांनी आज अनुभवले असुन वातावरणाततील गारवा वाढल्यामुळे थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र होते.रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्यांना देखील आपले वाहन अत्यंत धीम्या गतीने चालवावे लागत होते.सकाळी नऊ वाजले तरी देखील येथील धुक्याचे चित्र कायम असल्याचे पहावयास मिळाले.

गेल्या काही दिवसांपासुन येथे सुर्य दर्शन होत नसल्याने हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे.आज सकाळी तालुक्यासह परिसरात सकाळी नऊ वाजेपर्यंत धुक्यामुळे सूर्यदर्शन झाले नव्हते.सोमवारी तर बोधेगावकरांनी गुलाबी थंडीसोबतच दाट धुके व दवबिंदू असे मोहक वातावरण अनुभवले.

बोधेगाव शहर परिसरातील विविध भागांत सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती.पहाटे सुमारे दोन वाजेपासुनच दाट धुके पसरल्याचे शेतकऱ्यांकडुन समजते. धुक्यामुळे शहरातील रस्तेसुद्धा दिसत नव्हते. वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने बोधेगावमधुन जाणारा प्रमुख मार्ग असलेला शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील वाहतुक संथगतीने सुरू असल्याचे दिसुन आले. पंधरा ते वीस फुटांवरील व्यक्ती अथवा वाहनेही धुक्यामुळे दिसत नसल्यामुळे वाहनांचे दिवे सुरू ठेवुन चालकांना वाहन चालवावे लागत होते.

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Close Menu