Ad Code

#आरटीओ शिबीर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरिक्षकांचा जानेवारी २०२२ मधील जिल्हा दौरा कार्यक्रम



अहमदनगर  :  अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी २०२२ मधील शिबीर कामकाज दौरा घोषित झाला असुन तो पुढीलप्रमाणे असेल.

पाथर्डी येथे ६ आणि २७ जानेवारी,
श्रीगोंदा येथे ७ जानेवारी,
शेवगाव येथे १० आणि २९ जानेवारी,
टाकळीढोकेश्वर येथे ११ जानेवारी,
काष्टी येथे १२ जानेवारी,
चौंडी येथे १३ आणि ३१ जानेवारी,
जामखेड येथे १८ जानेवारी,
कर्जत येथे २४ जानेवारी आणि पारनेर येथे २५ जानेवारी.
             प्रत्येक तालुक्यात मासिक दौऱ्याचा दिवस उपरोक्त नमुद दिनांकाप्रमाणे असेल. या दिनांकाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी किंवा शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोयीस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल.
                यावेळी अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे स्विकारली जाणार नाही.शिबिराच्या कामकाजाबाबतचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने बंधनकारक भरणे आहे.शिबिराच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने तसेच बसेसची तपासणी करण्यात येणार नाही.ज्या तालुक्यात शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे, त्या तालुक्यातील नागरिकांचेच शिबिरामध्ये कामकाज करण्यात येईल.शिबिर कामकाज ठिकाणी तपासणी होणा-या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेतर संवर्गातील वाहनांचे 'डिस्क्लेमर' असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अहमदनगरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu