Ad Code

#शेवगावचे विस्ताराधिकारी कराड, केंद्रप्रमुख ढाकणे व शाखा अभियंता पट्टे यांचे निलंबनशेवगाव  :  शेवगावचे विस्तार अधिकारी(शिक्षण) तथा तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असणारे रामनाथ कराड आणि शेवगाव तालुक्यात कार्यरत केंद्रप्रमुख रामराव ढाकणे व शाखा अभियंता जयेंद्र पट्टे यांनी जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी विना परवानगी इतर मालकीच्या जागेवर प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्याचे बांधकाम केल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सेवा (वर्तणुक) नियम १९६७ (३) चा भंग केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

हेही वाचा  - #माजी आमदार घुले : शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले

          बोधेगाव(ता.शेवगाव) येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्यांचे मंजुर बांधकाम विनापरवानगी जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी इतर मालकीच्या जागेत बांधकाम केले आहे.ही बाब जिल्हा परिषद सेवा (वर्तणुक) नियम १९६७ (३) चा भंग करणारी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अधिकारी कराड,केंद्रप्रमुख ढाकणे व शाखा अभियंता जयेंद्र पट्टे यांचेवर शिस्तभंग कारवाई निश्चित करत त्यांचे काल(ता.१०)निलंबन आदेश जारी केले आहेत.बोधेगाव प्राथमिक शाळेचे जिल्हा परिषदेच्या जागेऐवजी इतरत्र जागेवर सुरु असल्याचे वेळीच निदर्शनास आणुन न दिल्याचा ठपका केंद्रप्रमुख ढाकणे यांचेवर तर जिल्हा परिषदेऐवजी इतर मालकीच्या जागेवर बांधकाम करणेकामी सदर जागेवर रेखांकन करून देऊन अनियमितता केल्याचा ठपका शाखा अभियंता पट्टे यांचेवर ठेवल्याचे आदेशात नमुद केले आहे.

          निलंबन काळात विस्ताराधिकारी कराड,केंद्रप्रमुख ढाकणे व शाखा अभियंता पट्टे यांना नेवासा मुख्यालय देण्यात आले असुन नेवासा गट शिक्षणाधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमुद केले आहे.तसेच निलंबन कालावधीत त्यांना खासगी नोकरी स्वीकारण्यास स्वीकारता येणार नाही.तसे केल्यास निलंबन निर्वाह भत्ता गमवावा लागेल आणि त्यांचेवर दोषारोप ठेवण्यात येईल अशाही सुचना देण्यात आल्या आहेत.

         दरम्यान,एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने शेवगाव तालुक्यातील प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu