Ad Code

#विधायक उपक्रम : वृक्षांना फेटे बांधून खताचा केक कापून बोधेगावात आगळावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा..!शेवगाव  :  प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचा समतोल तसेच निसर्गाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण संवर्धनासाठी लोकचळवळ संकल्पना अंमलात आणणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे भूतलावर दिवसेंदिवस विविध बदल होत असल्याने नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे हरित वनराईचे पट्टे निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी केले.


बोधेगाव (ता.शेवगाव) येथील ग्रामपंचायत सदस्य पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज(रविवार) रोजी अनावश्यक तसेच अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर आणि स्मशानभूमीत वृक्षांना खतांचा केक कापून व फेटे बांधून वृक्षारोपण करण्यात आले तसेच विविध प्रकारच्या ५१ वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
            यावेळी बोधेगावचे उपसरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे,कमुभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते बाबा पठाण,बबन कुरेशी,कासमभाई शेख,अशोक खिळे,बन्सी मिसाळ,सुनील कोहोक,वसीम शेख,रहीम शेख,अन्सार शेख,दत्तू मिसाळ,प्रमोद मिसाळ,ठेकेदार समीर शेख,अन्वर मणियार, ज्योतिराम शेळके,आजीम पठाण,पांडु तेवर,अनिस सय्यद,गणेश वारकड,तय्यब शेख,शाहरूख शेख,आजीम बागवान,बाबूभाई बागवान,गुलाम हुसेन आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu