नगर. ः नगर जिल्ह्यात गेल्या सात महिन्यानंतर आज पहिल्यांदा कोरोना रुग्णांच्या संख्येेत झपाट्याने वाढ झाल्याचे पहायला मिळाले. मागील आठवड्याच्या तुलनेत आज (शुक्रवारी) शंंभर रुग्ण अधिक होते. वाढती रुग्णसंख्या पाहता नगर जिल्ह्यात तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन प्रशासन नियोजन करत आहे.
नगर जिल्ह्याने कोरोनाची दोन लाटा अनुभवल्या आहेत. दोन्ही लाटेत लोकांचे खुप हाल झाले. बाधित झालेल्यांना रुग्णालयात उपचार करताना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. गेल्या सात महिन्यात रुग्णसंख्या कमी झाली. लोकांनी लसीकरण करावे असे अवाहन केले. त्यानुसार पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक लोकांचे लसीकरणही झाले आहे.
आता चार-पाच दिवसापासून नगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. चार दिवसात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. 4 जानेवारी रोजी बाधित 50 रुग्ण होते. त्यात नगर शहरात 8 रुग्ण होते. 5 जानेवारीला ही बाधित रुग्णसंख्या 115 झाली, त्यात नगर शहरात 21 रुग्ण आढळले. 6 जानेवारीला बाधित रुग्णसंख्या 156 झाली. त्यात नगर शहरात 39 रुग्ण आढळले तर आज (7 जानेवारी) 170 बाधित रुग्ण आढळले आसून त्यात नगर शहरात 59 रुग्ण आढळले.त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे लोकांनी कोरोनाच्या नियमाचे पालन करावे असे अवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 टिप्पण्या