Ad Code

अहमदनगर जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये दोन फेब्रुवारी पासुन सुरू होणार ; जिल्हाधिकारी डॉ.भोसलेंची माहिती


अहमदनगर  :  को‍विडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने  ठरवुन दिलेले नियम आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या शाळा व महाविद्यालये सुरु केली जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड लसीचे दोन्ही तसेच मुलांनी लसीचा पहिला डोस घेतलेला असावा आणि शाळेत येण्यासाठी पालकांचे सहमती पत्राच्या अटीवरच शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.


कोरोना रूग्णसंख्या रोखण्यासाठी आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाय योजनांचा आढावा जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्य  प्रणालीद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सभागृहात घेतला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे,महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.तर सर्व उपविभागीय अधिकारी,गटविकास अधिकारी,तहसीलदार,तालुका आरोग्‍य अधिकारी दूरदृष्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत जिल्‍हाधिकारी डॉ.भोसले यांनी जिल्‍‍ह्यातील प्रशासकीय यंत्रणा,आरोग्‍य यंत्रणा यांच्या कामकाजासंदर्भात माहिती घेतली.तालुक्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात आरोग्ययंत्रणेस सुचना केल्या.शासनातर्फे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागू केलेल्या  निर्बंधांचे तंतोतंत पालन होईल याबाबत दक्षता घ्यावी तसेच शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu