Ad Code

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप २०२१-२२ साठी डीबीटी वर अर्ज करण्यासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत मुदत ; पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे समाज कल्याणचे आवाहन


अहमदनगर :  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली आहे.


हेही वाचा  -  अहमदनगर जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालये दोन फेब्रुवारी पासुन सुरू होणार ; जिल्हाधिकारी डॉ.भोसलेंची माहिती

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी,परीक्षा शुल्क,देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 'महाडीबीटी' प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.

उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया व राउंड अजुनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा याचा विचार करून विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिकसाठी अर्ज करणे तसेच पुर्वीच्या अर्जाचे नुतनीकरण करणे यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असल्याची अशी माहिती सहायक आयुक्त देवढे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu