Ad Code

टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वारंगुळे पाटील यांचे अपघाती निधन


जालना  :  येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संभाजीराव वारंगुळे पाटील यांचे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुचाकीच्या धडकेत दुःखद निधन झाले.

मुळ तोंडोळी,ता.पाथर्डी (जि. अहमदनगर) येथील रहिवाशी असलेले डॉ.पाटील यांनी शहरातील अंकुशराव टोपे महाविदयालयाचे प्राचार्य पद भुषविण्यापुर्वी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणुन काम पाहिले होते.अत्यंत शांत आणि सयंमी नेतृत्वगुण असलेले डॉ.संभाजीराव कडक शिस्तीचे भोक्ते होते.विद्यापीठाचे राज्यशास्त्र विषयाचे पीएच.डी करिता मार्गदर्शक म्हणुनही त्यांनी अनेक विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu