Ad Code

प्रा.स्वप्नील बोधणे यांना पीएच.डी प्रदान

पीएच.डी प्राप्त प्रा.स्वप्नील बोधणे

पैठण  :  येथील प्रतिष्ठाण महाविद्यालयात कार्यरत असलेले राज्यशास्त्राचे प्रा.स्वप्नील अंकुशराव बोधणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्यशास्त्र विषयातील पीएचडी नुकतीच प्रदान केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.शुजा शाकीर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


प्रा.बोधणे यांनी ' भारतातील नवीन राज्यांची मागणी : एक राजकीय विश्लेषण ' या विषयावर औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.शाम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण करून प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता.प्रा.बोधणे यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पाच शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.


पीएच.डी प्राप्त केल्याबद्दल प्रा.डॉ.स्वप्नील बोधणे यांचा मार्गदर्शक डॉ.शाम कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


या यशाबद्दल प्रा.बोधणे यांचे 'प्रतिष्ठाण शिक्षण प्रसारक मंडळा'चे अध्यक्ष रविंद्र पाटील शिसोदे,सचिव राजेंद्र पाटील शिसोदे,युवा नेते सुशील पाटील शिसोदे,'बामु' विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.शुजा शाकीर,सामाजिक शास्रे विभागाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत अमृतकर,विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे,प्रतिष्ठाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी सोनकांबळे,उपप्राचार्य डॉ.प्रकाश तुरुकमाने,महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.आर.एन तिडके,मित्रवर्य सर्वश्री डॉ.किरण गायकवाड,प्रा.सचिन थोरात,डॉ बालासाहेब बोधणे,प्रा.अमोल म्हस्के,प्रा.रामेश्वर तांबे,प्रा.सुनिल भारोडकर,प्रा.लोकेश कांबळे,प्रा.सुनील मोरे,डॉ.श्याम देशमुख,पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे,डॉ.नामदेव सुर्यवंशी,डॉ.बाळासाहेब पवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले.पीएच.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रा.डॉ.बोधणे यांचे परिसरातुन कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

Close Menu