Ad Code

काकडे डी.फार्मसीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी


शेवगाव  :  तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ डी.फार्मसीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,वकृत्व स्पर्धा व रक्तदान शिबिर आदि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या विविध उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी हिरारीने सहभागी झाले होते.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध रांगोळ्या रेखाटल्या.

चित्रकला स्पर्धेत अभिषेक दगडु मस्के याने प्रथम क्रमांक, सौरभ राजेंद्र लोंढे याने द्वितीय क्रमांक तर कल्याणी प्रभाकर शेंदरे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. रांगोळी स्पर्धेत स्नेहा अर्जुन वखरे हिने प्रथम क्रमांक, कामिनी भीमराव मुळे हिने द्वितीय क्रमांक तर पुजा संजय दहिफळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व स्पर्धेत विश्वंभर राऊत याने प्रथम क्रमांक, साक्षी गायकवाड हिने द्वितीय क्रमांक तर साक्षी खरात हिने तृतीय क्रमांक मिळवला.


कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्राचार्य प्रा.राजेश मोकाटे,प्रा.सोमनाथ वडघने,प्रा.असिफ शेख असिफ,प्रा.जयश्री कोकाट,प्रा.तेजस्विनी साळुंके यांचेसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu