Ad Code

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात मराठी भाषा व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

बार्शी येथील शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग केले.

बार्शी  :  येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयामध्ये आज मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.व्ही.एम गुरमे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.पी गुंड होते.
कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे,डॉ. सी. व्ही रमण, कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकाचे अनावरण आणि विज्ञान प्रयोगाचे उद्घाटन व पुस्तक प्रदर्शनाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. गुरमे यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान तंत्रज्ञानाचे स्थान याविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादरीकरण केले.यावेळी प्राचार्य डॉ.गुंड,प्रा.जे.पी गायकवाड यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांचेही मनोगते झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ए.एस धुमाळ यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. जे. बी जळकुटे यांनी करून दिला. आभार प्रा.माधुरी शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.यावेळी अध्यापक विद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा.आर.एन साबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu