Ad Code

बोधेगावच्या ब्राइट फ्युचर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

शेवगाव  :  तालुक्यातील बोधेगाव येथील ब्राइट फ्युचर कॉलेज,सनराईज पब्लिक स्कूल व आरोही माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराज,माता जिजाऊ,महाराणी सईबाई व मावळ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून महाराजांच्या प्रतिमेची पालखीतुन मिरवणूक काढत शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष केला.

मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात सृष्टी कासुळे,ऋतुजा धारकर,भरती सुसे,नैतिक गुंजाळ,साई तोतरे,विठ्ठल बटुळे,वैष्णवी बोडखे,पल्लवी कापसे,सिद्धेश पालवे,आरती मस्के,समर्थ तोतरे,नितीन गाडे या विद्यार्थांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगते,पोवाडे,लोकनृत्ये सादर केली तर शिक्षक किरण पाटील यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वात शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी प्राचार्य राकेश गर्जे,मुख्याध्यापिका प्रतिभा कुटे,समन्वयक आयुब शेख,महेश गरड,अमोल शिरसाठ आदिसह सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जैनुद्दीन शेख यांनी तर आभार पुजा अंगरखे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu