Ad Code

आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विज्ञान दिन साजरा

शेवगाव  :  तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.चंद्रशेखर घनवट हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेश मोकाटे यांनी केले.डॉ.घनवट यांनी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव,त्याचा झालेला परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.बोधेगावस्थित साईकृपा हॉस्पिटल व आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ़ फार्मसी अंर्तगत झालेल्या सामंजस्य करारातुन घेण्यात आल्याची माहिती प्राचार्य मोकाटे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यक्रमप्रमुख प्रा.आसिफ शेख यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.जयश्री कोकाट,प्रा.सोमनाथ वडघने,प्रा.तेजस्विनी सालुंके यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाकरिता संस्थेचे सचिव ॲड.विद्याधर काकडे,जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ,समन्वयक संपतराव दसपुते यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu