शेवगाव : तालुक्यातील बोधेगावमधील आबासाहेब काकडे ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयामध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले होते.
शिवजयंतीचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीवर छत्रपती शिवरायांच्या फ्लेक्सचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर प्रतिमापुजन करून छत्रपतींची आरती करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भरत जाधव भरत,प्रा.संदीप बडधे,प्रा.सोमनाथ डावखर यांचेसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिवजयंती निमित्ताने महाविद्यालयाने अहमदनगरच्या अष्टविनायक ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित केले.त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर लेखी प्रश्नमंजुषा घेतली. या दोन्ही उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
0 टिप्पण्या