शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार , महाशरद पोर्टलच्या https//mahasharad.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती त्याचप्रमाणे देणगीदार,अशासकीय सामाजिक संघटना व समाजसेवक हे नि:शुल्क नोंदणी करू शकतात.आवश्यक साहित्य मिळणेबाबत नोंदणी केल्यानंतर दिव्यांग व्यक्तींना श्रवणयंत्र,व्हिलचेअर,कृत्रिम अवयव,जयपूर फुट,तीनचाकी सायकल,अंध काठी,कुबड्या,ब्रेल किट आदि साहित्यांची सुविधा मोफत उपलब्ध होणार आहे.दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव व साहित्य उपलब्ध होणार आहे.
महाशरद पोर्टल दिव्यांग व्यक्तींना मदत मिळणेसाठी समाजातील दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था,कंपन्या यांना जोडणारा महत्वाचा दुवा असून एकाच छताखाली या सुविधा उपलब्ध होणार आहेत.जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांनी त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध होण्यासाठी व समाजातील दानशूर व्यक्ती,संस्थांनी आर्थिक मदत करण्यासाठी या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवढे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या