Ad Code

राज्यात पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचे (avakali paus) संकट

परभणी  :  राज्यात ६ मार्च पासून ढगाळ वातावरण तयार होऊन ८ ते ११मार्च दरम्यान ढगाळ वातावरण तयार होईल.तसेच उत्तर महाराष्ट्र,मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ व कोकण किनारपट्टी या भागात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

राज्याच्या विविध भागात हाताशी आलेल्या पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने व प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. ७ ,८ मार्चला हवामान ढगाळ राहील.त्यानंतर ८ ते ११ मार्च दरम्यान राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणीस आलेले गहू,हरभरा हे पीक ७ मार्च पर्यंत काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान,आधीच नैसर्गिक व कृत्रिम संकटाने मेटाकुटीला आलेले शेतकरी अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याच्या शक्यतेने चिंतेत सापडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu