Ad Code

अहमदनगरला ७ मार्चला लोकशाही दिनाचे आयोजन

अहमदनगर  :  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या सोमवारी ( ता.०७) रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह येथे करण्यात आल्‍याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

कोविड-१९ विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे लोकशाही दिन आयोजित करण्यात आलेला नव्हता.यापुढे मात्र प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या लोकशाही दिनास पोलीस,जिल्हा परिषद,पाटबंधारे,बांधकाम,परिवहन,सहकार,कृषी विभागांचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी हजर असतात.तरी संबंधितांनी उपरोक्त नमूद विभागाच्या तक्रारी तालुकास्तरावरील लोकशाही दिनात दाखल कराव्यात.तालुकास्तरावरील लोकशाही दिनात तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्याबाबत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणा-या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावा.तथापि न्यायप्रविष्ट,राजस्व/अपिल्स,सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी,विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकारले जाणार नाहीत. अर्जासमवेत तालुका लोकशाही दिनी अर्ज सादर केलेली पोहोच व इतर पुरक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.तालुकास्तरावरच तक्रारीचे निराकरण झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज देण्याची गरज भासणार नाही व तक्रारीचे निराकरणही लवकरात लवकर होऊन विलंब टळेल.याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना कळविण्यात आले असुन जनतेने याची नोंद घ्यावी असे जाहीर आवाहन प्रसिद्ध पत्रकाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu