Ad Code

'रेणुकामाता मल्टीस्टेट' तर्फे महिलांचा सन्मान

शेवगाव  :  नऊ राज्यात एकशे अकराहुन जास्त शाखा असलेल्या रेणुकामाता मल्टीस्टेट को.ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बोधेगाव परिसरात विविध क्षेत्रातील कार्यरत निवडक महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन गौरव करण्यात आला.
यांमध्ये शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडीच्या सरपंच मंगल अण्णासाहेब जाधव,उपसरपंच संगीता मच्छिद्र जायभाये,सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांच्या पत्नी तथा पिंगेवाडी ग्रामपंचायत सदस्य फरीदा चाँद शेख,बोधेगाव येथील संगीता सोलापुरे,कल्पना हुंडेकरी,द्वारकाबाई घोरतळे आदींचा सन्मान शाखाधिकारी आदिनाथ पांडुळे आदिनाथ,लिपिक अनिकेत म्हस्के,विशाल अंधारे यांचे उपस्थितीत रोखपाल वैष्णवी वैद्य हिच्या हस्ते करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu